चांद्रयान ३ मोहिमेत अनेक शास्त्रज्ञांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञ कित्येक महिन्यांपासून दिवसरात्र काम करत होते. चांद्रयानाची यशस्वीपणे उड्डाण झाली आहे.
चांद्रयानाच्या या मोहिमेत काही शास्त्रज्ञांनी खुप महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यापैकी सोहन यादव हे एक आहे. उर्बिटर इंटिग्रेशन आणि टेस्टिंग टीम ही या मोहिमेत खुप महत्वाची आहे. रांचीच्या खुंटी जिल्ह्यातील तपकरा या गावातील सोहन यादव हे सुद्धा याच टीममध्ये आहे.
तसेच सोहन यादव हे गगनयानाचाही भाग आहे. सोहनचे वडील हे ट्रक चालक आहेत. सोहन यांची घरची परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी चांगले शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ झाले आहे. तपकरा हे गाव खुप छोटे आहे. या गावातून शिकून ते मोठे शास्त्रज्ञ झाल्यामुळे यादव हे चर्चेत आले आहे.
गेल्या सात वर्षांपासून ते इस्त्रोमध्ये काम करत आहे. तर सोहनचे वडील घुरा यादव हे अजूनही ट्रक चालवतात. आपला मुलगा इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांच्या आईवडिलांना त्यांचा खुप अभिमान आहे. तसेच मोहिमेतही त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांच्या आईचे अश्रू आता अनावर झाले आहे.
सोहनची आई देवकी म्हणाल्या की, सोहन हा लहानपणापासूनच खुप हुशार होता. त्याला अवकाशाबद्दल खुप आकर्षण होते. त्यामुळे त्याची इच्छा असल्यामुळे त्याला हवे ते शिक्षण आम्ही दिले. चांद्रयान ३ मोहिमेतही तो सहभागी असल्यामुळे आम्हाला त्याचा खुप अभिमान आहे.
तसेच आसामच्या लखीमपुर गावातील लोकांनीही चांद्रयान ३ प्रक्षेपण बघितले आहे. कारण त्यांच्या गावातील चयन दत्ता यांनी या मोहिमेत महत्वाची भूमिका निभावली आहे. आपल्या मुलाचे यश पाहून चयन दत्ता यांच्या आईचे अश्रूही अनावर झाले होते.