---Advertisement---

Solapur News: सोलापूर हळहळलं! पोलिसाने दुपारी आपल्या घराचं दार उघडलं अन् समोरचं दृश्य पाहून हंबरडाच फोडला

---Advertisement---

सोलापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील अरविंद धाम पोलिस वसाहतीत एका पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे पोलीस वसाहतीत मोठा गोंधळ उडाला होता.

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने घरातील फॅनला गळफास घेतला. याबाबतची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. घटनेनंतर त्याला ताबडतोब खाली उतरवून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचे निधन झाले होते.

डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. यावेळी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. याठिकाणी पोलीस देखील आले होते. त्याने अचानकपणे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

शासकीय रुग्णालयात आई-वडिलांनी हंबरडा फोडला होता. मुलाचे वडील हे सोलापूर पोलिस मुख्यालय येथे तैनात आहेत. याबाबत अजून कोणतेही कारण समोर आले नाही. याबाबत तपास सुरू आहे.

त्याचे वय केवळ 16 वर्ष होते. तो कोणत्यातरी मानसिक तणावाखाली असल्याचे देखील सांगितले जात आहे. यामुळे त्याच्या शाळेत आणि मित्रांची देखील चौकशी केली जाणार आहे. यामध्ये आत्महत्येचे कारण समोर येईल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---