सोबत अभ्यास, एकमेकांना साथ, शेवटी यश खेचून आनलंच, ५ मित्र MPSC तून अधिकारी

नाशिक जिल्ह्यातील पाच मित्रांनी एक चांगला आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. या पाचही मित्रांनी नाशिकमधील एका अभ्यासिकेत दिवस रात्र एक करून अभ्यास करून एकमेकांना मार्गदर्शन करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून घवघवीत यश संपादन केले आहे.

यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. आकाश दिपक बोढारे, अनिल भिमराव बत्तीशे, राहुल नानासाहेब पवार, राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार निकम अशी त्यांची नावे आहेत.

यामध्ये राहुल नानासाहेब पवार हा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजगाव येथील आहे. त्याने अभ्यासाची सुरवात दोन वर्षांपूर्वी केली होती. मेहनतीच्या जोरावर राहुलने दोन परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. एमपीएससी परीक्षेत सलग दोन वर्षे २०२१ आणि २०२२ मध्ये मंत्रालय मुंबई येथे निवड झाली आहे.

तसेच आकाशची राज्य कर निरीक्षक आणि मंत्रालय क्लर्क अशा दोन जागांवर त्याची निवड झाली आहे. अनिल आणि आकाश या दोघांनी सोबतच अभ्यासाला सुरवात केली. विशेष म्हणजे अनिलने देखील दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. आता तो पोलीस उपनिरीक्षक किंवा मंत्रालय क्लर्क होईल.

तसेच राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार निकम हे दोन मित्र दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावातील आहेत. यातील राकेशने देखील दोन पदांची परीक्षा उत्तीर्ण झाला असून मुंबई मंत्रालयात क्लर्क आणि कर सहाय्यक पदासाठी त्याची निवड झाली आहे.

तसेच शुभम नंदकुमार निकम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंत्रालय क्लर्क म्हणून निवड झाली आहे. या पाचही जनाची मैत्री एक आदर्श मैत्री ठरली असून सध्या त्यांचे कौतुक होत आहे.