शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे ते वादात सापडले आहे. अनेक नेते, पक्ष त्यांच्यावर आक्रमक झाले असून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.
राज्यभरात संभाजी भिडे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळळी आहे. तसेच अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे देखील दाखल झाले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविरोधात आंंदोलने केली जात आहे.
आता संभाजी भिडे यांना थेट जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संभाजी भिडे यांना धमकी दिली आहे. भिडे यांना पोलिसांनी तातडीने अटक करावी नाही, तर मी त्यांचा जीव घेईल, असे सावजी यांनी म्हटले आहे.
सुबोध सावजी यांनी असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. सुबोध सावजी यांच्या धमकीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांंमुळे त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. चिपळूनमध्ये ३ ऑगस्टला त्यांचा कार्यक्रम होणार होता. पण प्रशासनाने त्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.
दरम्यान, राज्यभरातील अनेक नेते संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. संभाजी भिडे यांना तातडीने अटक करावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. पण अजून कोणतीही कारवाई त्यांच्यावर झालेली नाही.