सध्या मराठीतला कोणता चित्रपट चर्चेत असेल तर तो म्हणजे बाईपण भारी देवा. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ५७ कोटींचा गल्ला जमावला आहे. त्याने अनेक हिट सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे.
रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांनी चित्रपटात प्रमुख भुमिका निभावली आहे. त्यांच्या अभिनयाचे जोरदार कौतूक केले जात आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना भेटीही देत आहे.
अशात सुकन्या मोने हे एका गोष्टीमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहे. त्यांच्या एका पोस्टवर युजरने एक कमेंट केली होती. त्या कमेंटला त्यांनी असे काही उत्तर दिले आहे, जे चर्चेचा विषय ठरले आहे. तुम्ही ब्राम्हण असून मांसाहार करता, ऐकून वाईट वाटलं, अशी कमेंट एका युजरने त्यांच्या पोस्टवर केली होती.
युजरच्या कमेंटवर सुकन्या मोने यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सॉरी कोणी सांगितले मी मांसाहार करते? कोणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच चांगलं काय आणि वाईट हे ज्याने त्याने ठरवावं आणि हो मी शाकाहारी आहे, असे सुकन्या मोने यांनी म्हटले आहे.
सुकन्या मोने यांचे हे उत्तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या या उत्तराचे अनेकजण कौतूकही करत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने एक वस्तु सुकन्या यांना पाठवली होती. त्याबद्दल त्यांनी एक पोस्ट करत अमृताचे आभार मानले. त्याच पोस्टला एका युजरने ही कमेंट केली होती.
दरम्यान, सुकन्या मोने यांनी बाईपण भारी देवा या चित्रपटामध्ये दमदार अभिनय केला आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. सुकन्या यांनी या चित्रपटामध्ये माई ही भुमिका साकारली आहे. त्या भुमिकेचेही अनेकजण कौतूक करत आहे.