सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहे. त्यांच्या पात्रांमुळे ते घराघरात पोहचल्या आहे. आता त्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत भूमिका साकारणार आहे.
सुप्रिया पाठारे या सोशल मीडियावर खुप सक्रीय असतात. त्यातून त्या त्यांच्या खाजगी आयुष्यात काय घडतंय? त्यांच्या व्यवसायिक आयुष्यात काय घडतंय? याची माहिती देत असतात. अशात त्यांनी त्यांच्या मुलाच्या हॉटेलबद्दल माहिती दिली आहे.
सुप्रिया पाठारे इतक्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. तर त्यांचा मुलगाही अभिनय क्षेत्रात येईल असे सगळ्यांना वाटत होते. पण तसे झाले नाही. त्यांच्या मुलाला काहीतरी वेगळे करायचे होते. म्हणून त्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता.
सुप्रिया पाठारे यांच्या मुलाचे नाव मिहीर पाठारे असे आहे. तो गेल्या काही वर्षांपासून फुड ट्रक चालवत होता. ते यशस्वी झाल्यानंतर आता त्याने स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. सुप्रिया पाठारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.
https://www.instagram.com/p/CvkkMdkJimW/
मीहिर हा प्रोफेशनने शेफ आहे. परदेशात फुड ट्रक खुप प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याने ठाण्यात ते सुरु केले होते. मharaj असा त्याच्या फुड ट्रकचे नाव आहे. आता त्याने मharaj पावभाजी अँड फास्ट फूड कॉर्नर असे हॉटेल सुरु केले आहे.
ठाण्यातील खेवरा सर्कल, रामजी हॉटेलच्या समोर पोखरण याठिकाणी मिहीरचे हॉटेल आहे. नुकतेच त्याच्या हॉटेलचे उद्धाटन झाले आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही या उद्धाटनाला हजेरी लावली होती.