Supriya Pathare : सुप्रिया पाठारेंच्या मुलाचे हॉटेल अचानक बंद? अभिनेत्रीने सांगितलं धक्कादायक कारण…

Supriya Pathare : सुप्रिया पाठारे या मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या विनोदी अभिनयाचे सर्वजण कौतुक करत असतात. त्यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी हॉटेल सुरू केले होते. त्यांचा मुलगा मिहीर पाठारे याचेही स्वत:चे हॉटेल आहे. त्यांनी याबाबत अनेकदा माहिती दिली होती.

त्याच्या या आगळ्यवेगळ्या वाटेचे सर्वांकडून कौतुकही झाले होते. त्याचे ‘महाराज हॉटेल’ इतके दिवस फार चांगले सुरू होते परंतु आता ते बंद होण्याच्या मार्गावर आहे का अशीही सोशल मीडियावरून चर्चा सुरू झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते बंद देखील होतं.

आता या चर्चांमध्ये अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी इन्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘महाराज हे हॉटेल उद्यापासून सुरू होत आहे. तेव्हा नक्की भेट द्या. तसेच त्यांनी हॉटेल बंद ठेवण्यामागे कारण देखील सांगितले आहे.

त्याच्या या हॉटेलला अल्पवधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्या म्हणाल्या, मिहीरने काही महिन्यांपुर्वीच ठाण्यात महाराज हॉटेल सुरू केले. येथे स्पेशल पावभाजी मिळते. हे हॉटेल गेल्या 10-15 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे हे हॉटेल बंद झाल्याचे म्हटले जात होते.

याबाबत आम्हाला अनेकांचे फोनही आहे. परंतु असं काहीच नाही. 21 ऑक्टोबर रोजी माझ्या आईचे निधन झाले. आईचे निधन झाल्याने आम्ही हॉटेल बंद ठेवले होते. यामुळे ते आता सुरू होणार आहे. आता आईचं कार्य झालं. बिझनेस आहे तो सूरू ठेवायलाच पाहिजे.

त्यामुळे 3 तारखेपासून पुन्हा हॉटेल सुरू होणार आहे. यामुळे तुम्ही नक्की या असेही त्यांनी पोस्ट करून म्हटलं आहे. यामुळे आता अनेकांना याबाबत प्रश्न पडला होता, त्यांना आता याबाबत उत्तर मिळाले आहे.