सुष्मिता सेनचं हैराण करणारं वक्तव्य; म्हणाली, मराठी कलाकारांसोबत काम करणं कठीण कारण…

सुष्मिता सेनची ताली ही वेब सिरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरिजची खुप चर्चा होत आहे. गौरी सावंत यांच्यावर ही वेब सिरिज आधारित आहे. सुष्मिता सेन या वेब सिरिजमध्ये मुख्य भुमिकेत आहे.

गौरी सावंत या एक तृतीयपंथी असून त्या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहे. त्यांनी २०१० मध्ये तृतीयपंथींच्या हक्कासाठी सखी चारचौघी ही संस्था स्थापन केली होती. ट्रान्सजेंडर आई म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.

ही वेब सिरिज मराठी लोकांसाठीही खुप खास आहे. कारण या यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी काम केले आहे. सुव्रत जोशी, ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवी, कृतिका देव, नंदू माधव या मराठी कलकारांनी या वेब सिरिजमध्ये काम केले आहे.

सुष्मिता सेनसोबतच मराठी कलाकारांच्या अभिनयाचेही कौतूक केले जात आहे. आता तालीनिमित्त सुष्मिता सेनने एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिने मराठी कलाकारांच्या अभिनयावर भाष्य केलं आहे.

मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव वेगळा आहे. ते सगळेच उत्तम कलाकार आहे. नाटकासारखं ते प्रत्येक भूमिकेचा अभ्यास करत असतात. विशेष म्हणजे मराठी कलाकाराला कोणतीही भूमिका दिली तरी तो ती भूमिका तो जगत असतो, असे सुष्मिता सेनने म्हटले आहे.

मला या सर्व कलाकारांसोबत काम करताना खुपच मजा आली. पण त्यांच्यासोबत काम करताना मला थोडं कठीणही गेलं. कारण थोडं दडपण येत होतं. पण मराठी कलाकार खुप चांगले आहे. रवी जाधवांनी तर मला मराठी भाषाही शिकवली, असेही सुष्मिता सेनने म्हटले आहे.