कोल्हापुरातील वारे वसाहत परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून दोघा मित्रांचा वाद झाला. यातून वन कर्मचारी असलेल्या मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला गेला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वन कर्मचारी भास्कर कांबळे आणि भाजीपाला विक्रेता युवराज कांबळे दोघात मैत्रीचे संबंध होते. ते कुटुंबासह वारे वसाहत परिसरात राहत होते. दोघांची मैत्री घट्ट असल्याने परिवारात देखील मैत्री झाली होती. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. असे असताना मात्र अनैतिक संबंध असल्याचा संशय आला.
युवराजचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय वन कर्मचारी भास्कर कांबळे यांना येत होता. यामुळे ते लक्ष ठेवून होते. यामुळे दोघांत वाद होत होते. हा वाद मिटवण्यासाठी दोघे संभाजीनगर येथे एकत्र आले. सुरुवातीला वाद मिटलाही होता, मात्र वाद मिटवून परत जाताना वारे वसाहत येथे त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला.
यामुळे दोघात झटापट सुरू झाली. दरम्यान, यामध्ये भास्कर कांबळे खाली पडले. युवराजने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. यामुळे एकच खळबळ उडाली. नंतर तो पोलिस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती दिली.
वन कर्मचारी भास्कर शंकर कांबळे (वय वर्ष ५०, रा. आणाजे, ता. राधानगरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच युवराज बळवंत कांबळे (वय वर्ष २७ रा. कुडूत्री, ता. राधानगरी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली असून त्यांच्या परिवाराला एकच धक्का बसला आहे. याबाबत त्यांना काहीच कल्पना नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्यांना समजताच खळबळ उडाली होती.