BJP : राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार

BJP : राजकारणात कोणत्या क्षणी काय घडेल, हे सांगणे अवघड असते. मागील पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक धक्कादायक दावा केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. बच्चू कडू यांनी देशात मोठ्या उलथापालथीचा अंदाज व्यक्त केला आहे. … Read more

Oath-taking ceremony : खर्गेंसोबतच्या वादानंतर पवार रागाने निघून गेले, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन् म्हणाले…, भुजबळांचा गौप्यस्फोट

Oath-taking ceremony : मंत्री धनंजय मुंडे यांनी २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी षडयंत्राचा भाग होता, असा आरोप केल्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या आरोपावर प्रतिक्रिया दिली. भुजबळांनी यावर शंका व्यक्त करत, ‘हे षडयंत्र कोणी रचले?’ असा सवाल उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी शपथविधीला षडयंत्राचे … Read more

Chhatrapati Sambhajinagar : अजितदादांचा शरद पवारांना धक्का; बड्या भाजप नेत्याला भिडणाऱ्या आमदारालाच लावले गळाला

Chhatrapati Sambhajinagar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधानसभा निवडणुकीनंतर इनकमिंगची प्रक्रिया सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार सतीश चव्हाण उद्या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. सतीश चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचा पक्षप्रवेश मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ देणार आहे. सतीश चव्हाण यांनी … Read more

…तर भर चौकात नागडा करून मारू, तुरुंगात टाकू, राम सातपुतेचा मोहिते पाटलांवर हल्ला

रविवारी (8 डिसेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे ईव्हीएमविरोधी आंदोलनाला पाठिंबा देत महायुती सरकारवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी (10 डिसेंबर) भाजपने मारकडवाडीत शक्तीप्रदर्शन करत महाविकास आघाडीवर पलटवार केला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, आणि माजी आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडीवर कठोर शब्दांत टीका करत मोहिते पाटील … Read more

शरद पवार गटाला मोठा धक्का, ज्यावर सर्वात जास्त विश्वास दाखवला तोच उमेदवार सोडणार साथ

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले असून, विरोधी पक्षांची ताकद विधानसभेत मर्यादित झाली आहे. महायुतीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात तीन दिवसांचे विशेष अधिवेशन होणार असून, या अधिवेशनात नवनिर्वाचित 288 आमदारांना अस्थायी अध्यक्ष कालीदास कोळमकर शपथ देणार आहेत. विशेष … Read more

शपथविधीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार का आले नाहीत? फडणवीसांनी सांगीतले खरे कारण

राज्यात महायुतीच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. या भव्य सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्योग, बॉलिवूड, आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, विरोधी पक्षातील प्रमुख नेते अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. विरोधी पक्षातील नेत्यांच्या … Read more

Sharad Pawar : पक्षनाव, चिन्ह अजित पवारांना; निवडणूक आयोगाचा निर्णय, शरद पवार गटाने केली ‘ही’ घोषणा

Sharad Pawar : मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने एका धक्कादायक निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार गटाचा दावा मान्य केला. या निर्णयामुळे पक्षाचे नाव आणि ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी या निर्णयाला … Read more

बंडखोर अजितदादा अन् शिंदेंना जनता धडा शिकवणार, ठाकरे-पवारांना लागणार लाॅटरी; लोकसभेचा सर्वे आला समोर

२०२४ च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी दोन मोठे बंड झाले, एक म्हणजे एकनाथ शिंदेंचे आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे. या दोन्ही बंडामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तसेच याचा परिणामही निवडणूकांवर होणार आहे. कोणाला किती जागा मिळणार हे तर निवडणूकीनंतरच कळेल, पण त्याआधी इंडिया टुडेने एक सी व्होटरचा लोकसभा निवडणूकीचा एक सर्व्हे जाहीर केला आहे. … Read more

कोणत्या गटात जाणार, शरद पवार की अजित पवार? अखेर नवाब मलिकांनी घेतला मोठा निर्णय

राष्ट्रवादीत सध्या दोन गट पडलेले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट हा शरद पवारांचा आहे. सध्याची राजकीय परिस्थिती अजित पवारांकडे आमदारांचे संख्याबळ जास्त दिसत आहे. तसेच त्यांच्याकडे जाणाऱ्या नेत्यांची संख्याची वाढत आहे. अशात काही नेते असेही आहेत, ज्यांनी अजून आपण कोणत्या गटात आहे हे स्पष्ट केलेले नाही. नुकतेच नवाब मलिक हे तुरुंगातून … Read more

पुरुष पहाटे शपथ घेतात, महिलांनी सकाळी उठून रांगोळ्याच काढायच्या का? तरुणीचा थेट शरद पवारांना सवाल

शनिवारी पुण्यातील स्वजोस पॅलेस याठिकाणी संभाजी ब्रिगेड केड कॉन्क्लेव्हचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवारांनी तिथे उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींशी संवाद साधला होता. तसेच समाजकारण आणि अर्थकारण संंबंधित असलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. यावेळी एका तरुणीने … Read more