राज्यात रोज अपघातांच्या बातम्या समोर येत आहे. यामध्ये अनेकांचे जीव जात आहेत. असे असताना आता खंबाटकी घाटातील एका वळणावर चारचाकी कारचा अपघात झाला असून या अपघातात युवक-युवती जागीच ठार झाले आहेत.
अपघातानंतर शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातानंतर याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे शिरवळ येथून वाहतूक वळवण्यात आली आहे. यामुळे नंतर वाहतूक सुरळीत झाली.
खंबाटकी घाट संपल्यानंतर एस कॉर्नर परिसरात तरुण-तरुणीचं वाहन रस्त्यावर घसरून कंटेनरखाली गेल्याची घटना घडली आहे. गाडीवरील त्यांचा सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. कंटेनर चालकालाही वाहन आवरले नाही आणि तरुण-तरुणी थेट कंटेनर खाली आले.
यामध्ये कंटेनरखाली चिरडून तरुण-तरुणीचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. या भागात रस्ता दुरुस्तचंही काम सुरू आहे. यामुळे देखील अनेकांना अंदाज येत नाही. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अपघातस्थळी पोहोचण्यासाठी धाव घेतली आहे.
हा अपघात अतिशय भीषण होता. तरूण तरूणी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दवाखान्यात न्यायच्या आधीच ते गतप्राण झाले होते. ते दृश्य पाहून जाणाऱ्या येणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहात होता. कंटेनरचालक अपघातानंतर पळून गेला होता.
या भीषण अपघातामुळे रस्ता सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे. अजून किती दिवस निष्पाप जिवांचे असे प्राण जात राहणार असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत. रस्ता सुरक्षा नियम कडक करण्याची मागणी होत नाही.
यामुळे रोडवर गर्दी होत आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटात वाहनांचा चक्काजाम झाला होता. 500 गाड्या उभ्या असल्याने सगळ्या घाटात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
यामुळे शिरवळ येथून पंढरपूर फाट्यावरून लोणंद मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. खंबाटकी घाटात व आनेवाडी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत उत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी घरी जाण्यासाठी निघाले आहेत.
आनेवाडी व खेड शिवापूर टोलनाक्यावर अधिकच्या लेन सुरू केल्या आहेत. तसेच मुंबई, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे. दोन तासांचा प्रवास हा 6 तासांचा होत आहे.