दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर ही घटना घडली. यामुळे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
गोळीबारानंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. SRA प्रकल्पातून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दोन आरोपी कुर्ल्यात महिन्याभरापासून १४ हजार रुपये भाड्याने राहत होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की चार आरोपींना अडीच ते तीन लाखांचं कंत्राट देण्यात आलं होतं. हे पैसे ते वाटून घेणार होते. 3 लाख रुपये सुपारी घेऊन हा कट रचल्याची माहिती पुढे येत आहे.
हे तिघेही आरोपी विविध गुन्ह्यांसाठी हरियाणा तुरुंगात शिक्षा भोगत होते. यावेळी त्यांची भेट लॉरेन्स बिश्नोईच्या सदस्यांशी झाली होती. तेव्हाच या तिघांना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालायत दिली. यामुळे अधिकचा तपास सध्या सुरू आहे.
दरम्यान, गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि गौतम या तीन कथित नेमबाजांची आधी तुरुंगात भेट झाली होती. हे तिघेही हरियाणाच्या तुरुंगात बिश्नोई टोळीच्या सदस्याशी संपर्कात आले होते. दोन फरार आरोपींच्या शोधासाठी पुणे, हरियाणा, दिल्ली आणि उज्जैन येथे पथके रवाना झाली आहेत.
तसेच दोन आरोपी कुर्ल्यात महिन्याभरापासून भाड्याने राहत होते. चार आरोपींना अडीच ते तीन लाखांचे कंत्राट देण्यात आले होते. हे पैसे ते आपसांत वाटून घेणार होते. यामुळे आता येणाऱ्या काळात देखील अनेक धक्कादायक माहिती समोर येणार आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.