पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपींनी दारू व गांजाचे सेवन केले होते. तसेच जीपीएस लोकेशन लपवण्यासाठी तिघांनीही मोबाइल फ्लाइट मोडवर टाकले होते.
या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेल्या दुसऱ्या आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तैनात केली होती. दरम्यान, बोपदेव घाटात फिरण्यासाठी आलेल्या तरुण-तरुणीला आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून आरोपी पसार झाले होते. मात्र, पुणे पोलिसांनी चंद्रकुमारला अटक केली. त्यानंतर अख्तर शेखला प्रयागराज येथून ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपींना हुडकून काढण्यासाठी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले होते.
या घटनेत अख्तर शेख या गुन्ह्यामागचा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. घटनेच्या दिवशी आरोपींनी दारू वा गांजाचे सेवन केले. त्यानंतर ते लूटमार करण्यासाठी बोपदेव घाटात गेले. आरोपींनी बोपदेव घाटात जाण्यापूर्वीच आपले मोबाइल ‘फ्लाईट मोड वर टाकून लोकेशन लपवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, घटनेनंतर अख्तर शेख नागपूरला गेला. त्याची पत्नी नागपूरमध्ये राहते. दोन महिलांसोबत त्याचे अनैतिक संबंध असून, त्यापैकी एक अमरावती येथे आणि दुसरी कोंढव्यात राहते, अख्तर शेख नागपुरात चार दिवस राहिला, मात्र याबाबत कोणाला काही माहिती मिळाली नाही.
पोलिसांनी चंद्रकुमारला अटक केल्यावर त्याने ११ ऑक्टोबर रोजी नागपूर सोडून प्रयागराजला धाव घेतली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. मात्र पोलिसांनी सापळा रचून त्याला देखील अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती.