मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर त्यांचा मृतदेह आढळला. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. ते ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते.
दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, रात्री त्यांना एक फोन आला आणि मी एका वैयक्तिक कामानिमित्त जात आहे असे त्यांनी सुरक्षारक्षकाला सांगितले. नंतर ते घराबाहेर पडले. त्यांनी याबाबत दुसरे कोणाला सांगितले नव्हते.
ते गाडी न घेता रिक्षाने गेले होते. घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली गेले. तिथे ते रुळावर झोपले. मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेगात असलेली लोकल त्यांच्यावरुन गेली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. सुधीर मोरे हे मुंबईत शिवसेनेचे नगरसेवक आणि ईशान्य मुंबईचे माजी विभागप्रमुखही होते. ते ठाकरेंचे एकनिष्ठ मानले जात होते. यामुळे ठाकरेंना हा मोठा धक्का आहे.
दरम्यान, सुधीर मोरे यांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर येत आहे. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली होती.