Thane News : डोंबिवलीत एका आरोपीला मानपाडा पोलिसांनी आजमगड येथून अटक केली. मानपाडा पोलिसांच्या पथकाला हा आरोपी पकडण्यासाठी वीटभट्टी कामगारांचा पेहराव करावा लागला. यामुळे याची चांगलीच चर्चा झाली.
राजेश अरविंद राजभर असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर 22 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तब्बल २१,२६,६००/- रूपये किंमतीचे ३४३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. याबाबत फिर्यादी ओमकार भाटकर भोपररोड, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व येथे राहतात. ते आपल्या गावी गेले होते.
असे असताना आरोपी राजेश राजभर हा भाटकर यांच्या घराचा दरवाज्याची कडी तोडून सोन्या, चांदीचे दागिने चोरी करून पसार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सुचनांप्रमाणे तपास चालू केला. आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळवली.
तो मुळगाव जि. आजमगड उत्तरप्रदेश येथे जाऊन अस्थित्व लपवून राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. पोलिसांनी विटट्भटटी कारखान्यावर थांबून कामगारांप्रमाणे पेहराव करून सापळा रचला. यावेळी आरोपी गाडीवर आला.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने आणि त्यांचा टीमने आरोपीला पकडण्यासाठी खूप मेहनत घेतली. वीटभट्टीवर कामगारांच्या रूपात वेशांतर करून दोन दिवस त्या ठिकाणी थांबून त्यानंतर हा आरोपी मोटरसायकलवरुन जात असताना त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले.
मानपाडा पोलीस स्टेशनला आरोपी पकडण्यात यश आले आहे असून सोनं जप्त केले आहे. या कामगिरीमुळे पोलिसांचे कौतुक केले जात असून त्यांनी याबाबत योग्य माहिती घेऊन वेषांतर करून आरोपींना पकडले आहे.