आता आपली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. पप्पा, मागे हटू नका, आरक्षण घेतल्याशिवाय घरी येऊ नका, असा संदेशच जरांगे पाटलांच्या लेकीने त्यांना दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील जालन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण करत आहेत.
यावेळी त्यांचे कुटूंबीय त्यांना धीर देत आहेत. जरांगे पाटलांचे वडील आणि पत्नी यांनीही समाजासाठी काहीतरी करून दाखवायची हीच वेळ असल्याचे सांगत तुमच्यासोबत आहोत, आरक्षण घेऊनच घरी या, असा संदेश दिला. सध्या जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या मराठा आंदोलनातील केंद्रस्थानी असणारे मनोज जरांगे यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. असे म्हणत त्यांनी सरकारला घाम फोडला आहे. यामुळे सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू आहे. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
आपले वडील लवकरात लवकर घरी यावेत, अशी इच्छा त्यांच्या मुलांनी बोलून दाखवली. अनेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते पहिल्यापासूनच तयार असतात. ते एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. बारावीपर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलने केली.
अगदी गेल्या काही महिन्यात अनेक गावात उपोषण केले. त्यांच्या आंदोलनाला किंवा उपोषणाला मोठी गर्दी होत असते. गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी होते. मनोज जरांगे पाटील यांनी शिवबा ही संघटनाही स्थापन केली. जरांगे हे शहागडच्या मध्ये एका छोट्या घरात राहतात. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथेही त्यांनी उपोषण केले होते.
या आंदोलनाचीही चर्चा झाली होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलवले होते. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. अनेकांचे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत.