उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ऐन लग्नाच्या दिवशी नवरी मुलगी ब्यूटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली. पण बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी परतलीच नाही. नवऱ्या मुलाची वरात लग्नमंडपात दाखल झाली. मात्र नंतर धक्कादायक कारण समोर आले.
मंडपात मुलीच्या घरच्यांनी मुलाकडील लोकांचे जोरदार स्वागत केलं. नाश्ता-पाणीही झाला. लग्नाच्या आदिचे काही विधी पूर्ण करुन नवरा स्टेजवर आला. जमलेली मंडळी गाण्यावर नाचत होती. मात्र मुलगी पळून गेल्याने एकच खळबळ उडाली.
त्यामुळे नवरा मुलाच्या कुटुंबियांनी नवरी मुलीकडच्या लोकांकडे चौकशी केली. कारण कळल्यावर त्यांना धक्काच बसला. शेवटी लग्न न करताच मुलगा आणि वरात आपल्या घरी परतली. यामुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. याप्रकरणी नवरा मुलाच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
दरम्यान, मुलीच्या वडिलांना मुलीला फोन केला. त्यावेळी तीने मला लग्न करायचे नसल्याचे सांगितले. तिने लग्नाला नकार कळवला. ब्युटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडलेली मुलगी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली होती. यामुळे मोठा गोंधळ उडाला.
मुलीच्या वडिलांनी ही गोष्ट मुलाला कळवली. नंतर लग्न मंडपात एकच शांतता पसरली. मुलाकडची लोकं वरात घेऊन निघून गेले. तर मुलीच्या वडीलांना पोलिसात तक्रार दाखल केली. याबाबत पोलीस मुलीचा शोध घेत आहेत. मुलींचं एका मुलावर प्रेम असल्याचे सांगितले जात आहे.
ही गोष्ट घरच्यांना पण माहिती होती. घरच्यांचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. घरच्यांच्या जबरदस्तीमुळे मुलगी लग्नाला तयार झाली. पण ऐन लग्नाच्या दिवशी ती प्रियकरासोबत गायब झाली. यामुळे याची चर्चा रंगली आहे.