---Advertisement---

पतीच्या निधनाचा पत्नीला बसला मोठा धक्का अन् घडली भयानक घटना अख्या गावाच्या डोळ्यात पाणी

---Advertisement---

नांदेड जिल्ह्यातून एक दुःखद मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पतीच्या निधनाने धक्का बसलेल्या पत्नीचा देखील दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी आलं. देगलूर तालुक्यात ही घटना घडली आहे. घटनेनंतर पती-पत्नीच्या पार्थिवावर एकाच सरणावर अंत्यविधी करण्यात आला आहे.

हे दाम्पत्य देगलूर तालुक्यातील वळग गावातील रहिवासी आहे. त्यांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाले होते. त्यांनी ५० वर्ष एकत्र संसाराचा गाडा चालवला. सुख दुःखात एकमेकांना साथ दिली. यामुळे त्याचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.

त्यांना तीन मुले, मुली, सुना जावई आणि नातवंडे आहेत. असे असताना मात्र गंगाधर चंदावाड यांच अकाली निधन झाले. यामुळे घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. यामुळे पत्नी अंजनाबाई यांना देखील धक्का बसला. दरम्यान गंगाधर यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरु होती.

यावेळी पतीच्या निधनाने हंबरडा फोडत अंजनाबाई यांनी देखील प्राण सोडले. यामुळे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सगळेच भावूक झाले होते. घरातील दोन प्रमुख व्यक्तींचे एका पाठोपाठ निधन झाल्याने हळहळ व्यक्त होतं आहे

गंगाधर नागाजी चंदावाड (वय ७०) आणि अंजनाबाई गंगाधर चंदावाड (वय ६५) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेमुळे एकच धक्का त्यांना बसल्याने ही घटना घडली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---