‘हे’ आहे महाराष्ट्रातील शापित गाव! मुलाचा जन्म होण्याआधीच होतो बापाचा मृत्यू, मांगीन मातेने दिलाय शाप

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोहोळ तालुक्यात खरकटणे या गावाची एक शापित गाव म्हणून ओळख आहे. याचा इतिहास देखील वेगळाच आहे. अनेक वर्षांपूर्वी मातंग समाजाच्या एका महिलेचा खरकटणे गावात खून झाला होता.

मृत्यूपूर्वी तिने अख्ख्या गावाला शाप दिला होता. त्यामुळे हे गाव शापित झाल्याचे बोलले जाते. याबाबत माहिती अशी की, गावातील पाटलाच्या घरी मूल जन्माला यायच्या अगोदर त्याच्या बापाचा मृत्यू होणार, असा शाप तिने दिला होता.

असे असताना हा शाप खरा ठरला आणि गावातील पाटलाच्या घरी मूल जन्माला यायच्या अगोदर पाटलाचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थांनी गाव सोडले, आता गावात बोटांवर मोजण्या इतकी लोक याठिकाणी आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

अनेक ठिकाणी हे लोक स्थाईक झाले. पुणे, सोलापूर अशा ठिकाणी हे लोक राहत आहेत. खरकटणे गावात पूर्व-पश्चिम मुखी असणारे एकमेव मारुतीचे मंदिर आहे. गाव सोडून गेलेल्या नागरिकांच्या पुढच्या पिढ्या आजही दर शनिवारी या मारुतीच्या दर्शनाला जातात.

गावात हनुमान मंदिराच्या मागे महिलेची ही समाधी असून तिला ‘मांगीनमाता’ म्हटले जाते. याच मांगीन मातेने शाप दिला होता असे जुन्या काळातील ग्रामस्थ सांगतात. ओसाड झालेलं गाव हळूहळू लयास गेलं, गावातील जुने वाडे, जुनी घर नामशेष झाली आहेत.

खरकटणे गावचे पाटील साठ गावांत विभागले गेले, म्हणून आज येथील पाटलांना साठे-पाटील अशी आडनावे पडली आहेत. दरम्यान, या शापामुळे मात्र या गावाची चर्चा पूर्ण राज्यात आहे. यामुळे याची आजही चर्चा होत असते.