3 थ्री इडियट्स या चित्रपटात लायब्रेरियन दुबी ही भूमिका साकारलेले अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. अखिल मिश्रा यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. हा चित्रपट खूपच गाजला होता. यामध्ये त्यांनी काम केले होते.
अखिल त्याच्या स्वयंपाक घरात काम करत होता आणि घसरला. अखिल स्वयंपाकघरात जमिनीवर जखमी अवस्थेत सापडला आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
ते बाल्कनीजवळ काम करत होते, आणि उंच इमारतीमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. असेही म्हटले जात होते. मात्र आता समोर आले की स्वयंपाक घरात घसरुन पडले होते, असे सांगितले जात आहे.
स्वयंपाकघरात एका स्टूलवर चढून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. ते रक्ताच्या थारोळ्यात सापडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले.
ही घटना घडली तेव्हा अखिल यांची पत्नी सुझान बर्नर्ट ही हैदराबादमध्ये शूटिंग करत होती. यावेळी भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, माझे हृदय तुटले आहे, माझ्या आयुष्याचा भाग मला सोडून गेला आहे. अखिल मिश्रा यांनी डॉन, हजारों ख्वैशीं ऐसी, गांधी माय फादर, शिखर, कमला की मौत, वेल डन अब्बा या चित्रपटांमध्ये काम केले.
3 इडियट्स’मधील दुबे या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. प्रधान मंत्री या मालिकेत देखील त्यांनी काम केले. ते उतरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, हातिम आणि इतर अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांचा भाग होते.