स्मिता तळवलकरांची नात आहे ‘या’ तरुणाच्या प्रेमात, वाढदिवसाच्या दिवशी तर सर्वांसमोर दिली होती प्रेमाची कबुली

स्मिता तळवलकर या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. चौकट राजा, तु तिथे मी, सवत माझी लाडकी यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला होता.

त्यांचा अभिनय क्षेत्रातील वारसा त्यांची सुन सुलेखा तळवलकर चालवताना दिसून येत आहे. सुलेखानेही अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पण स्मिता तळवलकर यांच्या नातीला मॉडेलिंगची आवड आहे.

टीया तळवलकर असे तिचे नाव आहे. टीयाने २०२१ मध्ये मिस दादर ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर ती खुप चर्चेत आली होती. टीया ही दिसायला खुप सुंदर आहे. ती तिच्या मॉडेलिंगच्या करिअरसोबतच एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

आता टीयाच्या बॉयफ्रेंडची चर्चा रंगली आहे. बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाला तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये तिने एक व्हिडिओ शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यांचा तो व्हिडिओ खुप चर्चेत आला होता.

नमीत काळे असे टीयाच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. तो एक व्हिडिओ क्रिएटर आहे. टीया आणि नमीत या दोघांचेही शिक्षण एकाच कॉलेजमधून झाले होते. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांची खास मैत्री होती. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

गेल्या तीन वर्षांपासून नमीत काळे आणि टीया रिलेशनशिपमध्ये आहे. अखेर तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाला तिने सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिच्या कुटुंबानेही त्यांचे प्रेम मान्य केले आहे.

टीया ही आजीची म्हणजेच स्मिता तळवलकर यांची खुप लाडकी आहे. त्यांनी तिला बालकलाकार म्हणून संधीही दिली होती. पण ती या क्षेत्रात जास्त रमली नाही. त्यानंतर तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

स्मिता तळवलकरांचा टीया या नावाला सुद्धा विरोध होता. तिचे नाव मराठी असावे असे स्मिता यांना वाटत होते. पण तिच्या आईवडिलांनी तिचे नाव टीया ठेवले. त्यामुळे त्यांच्या इच्छेखातीर स्मिता यांनी ते मान्य केलं असलं तरी टीयाला घरी त्या दुर्गा या नावानेच हाक मारतात.