Travis Head : नुकत्याच झालेल्या क्रिकट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा (India) पराभव केला. यामुळे भारतीय चाहते नाराज झाले. असे असताना या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (Travis Head) विजयाचा खरा हिरो ठरला. यामुळे त्याची चर्चा सुरू आहे.
29 वर्षीय ट्रॅव्हिसने एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करण्याचाही विक्रम केला. अंतिम सामन्यात त्याच्या खेळीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा हेड दोन आयसीसी फायलनमध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे.
दरम्यान, हेडने वयाच्या सहाव्या वर्षी हातात बॅट घेतली. त्याला घराच्या मागच्या बाजूला दिवसरात्र क्रिकेट खेळण्याचे वेड लागले होते. त्यानंतर लवकरच तो अल्पवयीन स्तरावर क्रिकेट खेळू लागला. पुढे त्याने मागे वळून बघितले नाही.
17 वर्षांखालील वयोगट वेगवेगळ्या स्तरावर क्रिकेट खेळले. त्याने 2010 मध्ये ब्रिस्बेन येथे नॉर्दर्न टेरिटरी अंडर-19 विरुद्ध दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यामुळे पुढील रस्ता त्याच्यासाठी सुखर झाला.
दरम्यान, हेड फुटबॉल खेळता होता नंतर क्रिकेटपटू झाला. त्याला फुटबॉलची आवड होती. ट्रॅव्हिस साउथ गॉलर फुटबॉल क्लबसाठी फुटबॉल खेळत असे. तो एका भीषण अपघातातून देखील बचावला. 2013 मध्ये त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला आठ आणि पाठीला सहा टाके पडले होते.
असे असले तरी त्याने क्रिकेट खेळणे सोडलं नाही. हेडने 13 जून 2016 रोजी वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हा सामना ऑस्ट्रेलियाने चार विकेटने गमावला. या सामन्यात तो एक धावा करुन माघारी परतला होता, मात्र पुढे त्याने आपल्या देशासाठी जोरदार कामगिरी केली.