रिक्षाचालकाची पोरगी कष्टाने MBBS डाॅक्टर झाली, पण पदवी स्विकारतानाच कोसळला दुखःचा डोंगर

आईवडिल आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगली नोकरी मिळावी यासाठी त्यांना कष्टाने मोठं करतात. अनेक मुलं-मुली आपल्या आईवडिलांचे कष्टाचे चीज करतात. ते इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर यश मिळवून दाखवतात.

अशीच एक कहाणी आता छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. तृप्ती मगरे असे या तरुणीचे नाव असून तिने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. ती एक सामान्य कुटुंबातील असून तिचे वडील हे रिक्षाचालक आहे.

झोप़डपट्टी भागात राहत असतानाही जिद्दीच्या बळावर तृप्तीने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात तिचे कौतूक केले जात आहे. तृप्ती हुशार असल्यामुळे तिच्या घरच्यांनी तर तिला प्रोत्साहन दिलेच, पण तिच्या शिक्षकांनीही तिला खुप मदत केली.

तृप्ती पहिली ते दहावीपर्यंत चांगले गुण मिळवत आली होती. बारावीनंतर नीटच्या परीक्षेतही तिला उत्तम गुण मिळाले होते. मुलीने डॉक्टर व्हावं अशी तिच्या आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानंतर तिने गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरला प्रवेश घेतला.

या कॉलेजमध्ये अनेक श्रीमंत मुलामुलींना प्रवेश मिळाला होता. त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे ते मौजमजाही करायचे. पण तृप्तीला शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्यासाठीही घरी फोन करताना विचार करावा लागयचा. पण तिने मेहनत करुन अखेर एमबीबीएसची पदवी मिळवली.

तृप्तीने पदवी मिळवली असली तरी तिच्यावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. कारण ती डॉक्टर बनावं असं तिच्या आईचं स्वप्न होतं. आता तिला एमबीबीएसची पदवी मिळाली, पण तिची आई या जगात नाहीये. पदवीच्या समारंभाला सर्वांचे पालक आले होते. पण आपली आई तिथे येऊ शकली नाही, याचं दु;ख तृप्तीला आहे.