दोन मुलींची आई असलेल्या विवाहिताने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसात घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे धक्कादायक कारण देखील समोर आले आहे. मुलगा होत नसल्याने सासरी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने हा निर्णय घेतला आहे.
याबाबत पोलीस तपास करत आहेत. अस्मिता आणि केदारी यांचा 13 वर्षांपूर्वी केदारी यांच्याशी विवाह झाला होता. केदारी आणि अस्मिता यांना दोन मुली आहेत. मुलगा होत नसल्याने पती, सासू आणि सासऱ्याकडून तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू होता.
यामुळे त्रासाला कंटाळून अस्मिताने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. करवीर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. मृत विवाहिता अस्मिता चौगले यांचे वडील दगडू सदाशिव यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पती केदारी गणपती चौगले, सासू आनंदी गणपती चौगले आणि सासरा गणपती गुंडू चौगले (तिघे रा. कोथळी, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
दरम्यान, अस्मिता केदारी चौगले (वय 30, रा. कोथळी, ता. करवीर) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असुन पोलीस पुढील तपास करत आहेत.