दादांच्या खास आमदाराला घेरण्याचा प्लॅन ठरला, मातोश्रीवरून आदेश आला अन् ठाकरेंचा हुकमी एक्का लागला कामाला

शिवसेना फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. अनेक आमदार, खासदार शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्ष उभारावा लागत आहे. आता ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.

येत्या विधानसभा निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे उमेदवार शोधताना दिसत आहे. अशात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून संगमेश्वर विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांच्या नावाची चर्चा होत आहे.

तसेच मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांनी त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सुचना दिल्याचेही म्हटले जात आहे. रोहन बने हे जर तिथले उमेदवार बनले तर राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्यासाठी मोठं आव्हान निर्माण होणार आहे.

शेखर निकम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटात गेले आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी रोहन बने यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहे. ते माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र आहे.

रोहन बने यांचा त्या मतदार संघात चांगला संपर्क आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना तेथील अनेक कामे केलेली आहे. त्याचा फायदा त्यांना चिपळून संगमेश्वर मतदार संघात होताना दिसून येणार आहे.

ठाकरे गटासाठी रोहन बने हे त्या मतदार संघातील महत्वाचे नेते आहे. येत्या निवडणूकीत ठाकरे गटाला त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. असे असले तरी शेखर निकम हे खुप अनुभवी नेते आहेत. ते खुप अभ्यासू असून त्यांचाही खुप संपर्क आहे. त्यामुळे रोहन बने यांना संधी मिळाली तर त्यांच्यात कोणाचा विजय होईल याकडे सर्वांचे लक्ष असेल.

तसेच भास्कर जाधव हे नावही खुप चर्चेत आहे. आपल्याला ज्या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास सांगण्यात येईल त्या मतदार संघातून आपण निवडणूक लढवू असे ते बोलले होते. ते आधी चिपळुन संगमेश्वर मतदार संघाचे आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भास्कर जाधव हे सध्या गुहागरचे आमदार आहेत. त्यांचा विचार रत्नागिरी मतदार संघासाठीही केला जाऊ शकतो. भास्कर जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांना गुहागरमधून उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांत या मतदार संघात त्यांनी त्यांची ताकद वाढवल्यामुळे विक्रांत जाधवांसाठी हा मतदार संघ सेफ असल्याचे म्हटले जात आहे.

दापोली मतदार संघाचीही सध्या खुप चर्चा होत आहे. संजय कदम यांनी नुकताच राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना विद्यमान आमदार योगेश कदम यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.