Uddhav thackeray: ठाकरे कुटूंब खाजगी विमानाने दुपारीच रवाना, आदित्य ठाकरे अटक टाळण्यासाठी…

Uddhav thackeray: भाजप आमदार नितेश राणे यांनी एक धक्कादायक ट्विट केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या नोकर, कुक यांना घेऊन काल दुपारीच डेहराडून गेल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

यामुळे नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, जरांगे पाटलांचे उपोषण सुटेस्तोवर थांबला का नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. ठाकरे कुटुंबीय काल दुपारी दोन वाजता एका खासगी विमानाने गेट नंबर ८ वरून डेहराडूनला निघून गेल्याचे मला कोणीतरी सांगितले.

तसेच राणे म्हणाले की, त्यांच्यासोबत त्यांचा कूक आणि स्टाफही आहे. हीच त्यांची मराठा आरक्षणाची काळजी आहे का? जरांगे पाटलांचे उपोषण सुटेपर्यंत का थांबला नाहीत, असा प्रश्न देखील राणे यांनी उपस्थित केला आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

जे पक्षाचे काम करणाऱ्या, तुमच्यासारख्या पिकनिकवर न जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना दोष का द्यायचा, असेही ते म्हणाले आहेत. तसेच नितेश राणे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ते म्हणाले, मला आशा आहे की आदित्य ठाकरे अटक टाळण्यासाठी कुठे बेपत्ता होणार नाहीत. सुशांतसिंग प्रकरणाची कोर्टात लवकरच सुनावणी सुरु होईल, असेही राणे म्हणाले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामुळे आता आदित्य ठाकरेंना अटक होणार का? ते देश सोडून जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.