देशात पुढील वर्षी लोकसभा आणि राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सर्व राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. तसेच अनेक नेते पक्षांतर करत आहेत. शिवसेनेत मोठी फूट पडली असून ठाकरे गटात चिंता आहे.
असे असताना आता शिवसेना ठाकरे गटाने सत्ताधारी भाजपला मोठा झटका दिला आहे. ठाकरे गटाने भाजपच्या एका माजी मंत्र्याचे रक्ताचे नातं असलेल्या एका बड्या नेत्याला फोडले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
या नेत्याचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश झाला. यामध्ये ठाकरे गटाने अहमदनगर मधील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तसेच बबनराव पाचपुते यांना मोठा राजकीय झटका बसला आहे. साजन पाचपुते आज आपली आई आणि इतर कुटुंबियांसह 250 ते 300 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले. यामुळे ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात भाजपसाठी अडचण वाढणार आहे.
दरम्यान, मुंबईत उद्धव ठाकरे यांनी साजन पाचपुते यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी साजन पाचपुते यांना पक्षाच्या उपनेते पदाची जबाबदारी दिली. यामुळे आता येणाऱ्या काळात नगर जिल्ह्यातील सूत्र त्यांच्याकडे असणार आहेत.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मला आनंद आहे की सहकुटुंब आणि सहपरिवार शिवसेनेत आले आहेत. हा सहपरिवार माझ्या शिवसेना परिवारात आला आहे. माझा परिवार आता वाढत आहे, असे ठाकरे म्हणाले.