काल संपूर्ण बांग्लादेशात हिंसाचार सुरु होता. देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अराजकतत्व रस्त्यावर होती. परिस्थिती हाताबाहेर होती. कोणाकडे काय शस्त्र आहे? अशावेळी आपला हेतू साध्य कोण काय करेल? याची अजिबात कल्पना नव्हती. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडण्यासाठी शेख हसीना यांना सैन्याने काही वेळाचा अवधी दिला होता.
यानंतर त्यांनी तात्काळ भारतात येण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेश ते भारत हा शेख हसीना यांचा प्रवास सोपा नव्हता. कधी काय घडेल याबाबत सगळ्यांच्या मनात शंकाच होती. त्यामुळे शेख हसीना यांनी बांग्लादेश सोडल्यानंतर पुढचे काही तास महत्त्वाचे होते. सुरक्षित स्थळी जाण्यासाठी भारताने यंत्रणा कामाला लावली.
शेख हसीना भारतात येत असल्याच समजल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुद्धा प्रचंड खबरदारी घेतली. भारतीय सुरक्षा यंत्रणा कुठल्याही आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज होत्या. यामुळे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. कमी उंचीवरुन उड्डाण करणाऱ्या C-130J या विमानाला भारतात येण्याची परवानगी देण्यात आली होती.
विमानात कोण आहे? ते एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांना माहित होतं. मात्र याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. C-130J या अमेरिकन बनावटीच्या ट्रान्सपोर्ट विमानाने शेख हसीना भारतात आल्या. तेव्हा अनेकांना दिलासा मिळाला. यावेळी हल्ल्याची देखील शक्यता होती.
AJAX या विमानाची साईन होती. दुपारी 3 च्या सुमारास भारतीय सीमेजवळ कमी उंचीवरुन हे विमान उड्डाण करताना दिसले. इंडियन एअर फोर्सने आपले रडार Active केले होते. यानंतर काही वेळातच बांगलादेशमध्ये लोकांनी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी जाऊन सगळा ताबा घेतला.
दरम्यान, शेख हसीना यांच्या विमानाबरोबर कुठलाही घातपात होऊ नये, म्हणून यंत्रणांच अत्यंत बारीक लक्ष होतं. इंडियन एअर फोर्सचे प्रमुख वीआर चौधराी आणि आर्मी चीफ जनरल उपेन्द्र द्विवेदी हे सगळ्यावर लक्ष ठेऊन होते. यामुळे त्या सुरक्षित भारतात आल्या.