Vaibhav Mangle : प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले हे एक चर्चेत असणारे नाव आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठे नाव केले. टाईमपास चित्रपटाचे दोन्ही भाग, ‘फू बाई फू’ या कार्यक्रमांमुळे वैभव मांगले सर्वांना परिचित झाले. ते सामाजिक विषयांवर उघडपणे आपले मत मांडताना दिसतात.
सध्या त्यांनी केलेली अशीच एक फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. देशभरात गेल्या आठवड्यात मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. यासंदर्भात मांगले यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत यावर आपले मत व्यक्त केले आहे.
यामध्ये ते म्हणाले, आता दुर्गेच्या विसर्जनाच्या दिवशी रात्री ११ पर्यंत गरबा खेळून नंतर वाजत गाजत विसर्जनाची प्रथा कुठून सुरू झाली? असे वैभव मांगले यांनी म्हटले आहे. यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. अनेकांनी यावर चांगल्या तर काहींनी विरोधात मत व्यक्त केले आहे.
यावर एक युजर म्हणतो, यांना देवाच्या नावाने इव्हेंट साजरे करायचे असतात बाकी मुहूर्त, देव भक्ती सब झूट. तर एकाने, सध्या मिरवणूक नसून धिंड आहे असं वाटतं, आवाजाची मर्यादा नाहीच, नवीन प्रथांपैकी एक, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी मांगले यांच्या पोस्टवर केल्या आहेत.
दरम्यान, विजयादशमीच्या दिवशी अलीकडे रात्री उशिराने देवीचे विसर्जन केले जाते, यासंदर्भात ही पोस्ट केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, वैभव मांगले यांनी नाट्यगृहांची दुरावस्था, मराठी कलाकारांची सद्यस्थिती अशा अनेक विषयांवर आपली मतं मांडली आहेत.