गणपती मंडपात व्हिडीओ शुटिंग, IB अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन् नंतर…

नाशिकमध्ये आयबी व एटीएस अधिकाऱ्यांनी मनमाड येथे गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केली आहे. मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशय होता. चित्रीकरण करून ट्रेनने जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

यामुळे मनमाडमध्ये घातपाताचा कट उधळून लावला आहे. दहशतवादी कारवाईच्या संशयावरून इंटेलिजन्स ब्युरो व एटीएसने अर्थात दहशतवाद विरोधी पथकाने एकाला ताब्यात घेतले. यामुळे त्याची कसून चौकशी केली.

यामुळे मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाने चित्रीकरण करुन रेकी केल्याचा संशय होता. या संशयित व्यक्तीबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गणेश मंडळाचे चित्रीकरण करुन तो अजिंठा एक्सप्रेसने जात असतना नगरसूल स्थानकातून रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती या आधी देखील रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एटीएसने पहाटेपर्यंत संशयिताची कसून चौकशी करुन त्याला सोडून देण्यात आले आहे. या संशयित व्यक्तीबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.