Viral Video : तरुण मॉर्निंग वॉकला गेला, रिक्षा आली अन् घडलं भयंकर, थरकाप उडवणारा व्हिडिओ झाला व्हायरल..

Viral Video : सध्या उत्तप्रदेशमधून एक काळीज पिळवटून टाकणारी अपघाताची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या चिमुकल्याला रिक्षाने चिरडले असून ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या भयंकर अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. येथील जालौनमध्ये भरधाव ऑटोने एका तरुणाला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर रिक्षाने चिमुकल्या मुलाला लांबपर्यंत फरफटत नेले.

या दुर्दैवी घटनेत तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संबंधित रिक्षा चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहे. हा तरुण आपल्या मित्रासोबत मॉर्निंग वॉक करताना दिसत आहे. दोघेही रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव रिक्षा येत असल्याचे त्यांना दिसले. रिक्षाचालकाने मुलाला जोराची धडक दिली. हा रिक्षा चालक मोठ्या वेगाने येत होता.

धडक दिल्यानंतर मुलाला ५० मीटरपर्यंत फरफटत नेले. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता अपघातानंतर हा रिक्षाचालक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

असे असताना आता सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच काही जणांनी मुले चुकीच्या पद्धतीने रस्ता क्रॉस करत होती, त्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हणले आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.