स्वातंत्र्यदिनानिमित्त पंढरपुरच्या विठ्ठल मंदीरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट; पाहा सुंदर फोटो

मंगळवारी भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. संपुर्ण देशात वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेत हा स्वातंत्र्यदिन पार पडला. तसेच देशातील वेगवेगळ्या मंदिरांमध्येही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सजावट करण्यात आली होती.

अशात विठुरायांची पंढरीही सजताना दिसून आली. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात खास सजावट करण्यात आली होती. मंदिरामध्ये तिरंगी रंगांची फुले लावण्यात आली होती.

तसेच विठुरायालाही तिरंगी कपड्याने सजवण्यात आले होते. मंदिराच्या संपुर्ण गाभाऱ्याला तिरंगी रंगांच्या फुलांनी सजवण्यात आले होते. भगव्या रंगांचे फुल, पांढऱ्या रंगाचे फुल आणि हिरव्या रंगाची पाने याने संपुर्ण मंदिर सजवण्यात आले होते.

विठ्ठल रुक्मिणी या दोघांच्या मुर्तींच्या कपड्यांचा रंग हा तिरंगा होता. ही सजावट खुपच आकर्षक बनवण्यात आली होती. सोशल मीडियावरही याचे खुप फोटो व्हायरल होत असून ती सजावट सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

तसेच विठ्ठल रुक्मीणीच्या मंदिरात लाईटिंगही तिरंगी रंगाची करण्यात आली होती. जी खुपच सुंदर दिसत होती. ही सजावट आरास पुणे येथील श्रीमंत मोरया प्रतिष्ठान आणि सचिन चव्हाण यांच्यावतीने करण्यात आली होती.

दरम्यान, पुण्यातील श्रीमंत दगडू शेठच्या मंदिरातही खास सजावट करण्यात आली होती. तिथेही तिरंगी लाईटिंग लावण्यात आली होती. तसेच कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचीही भारत मातेच्या रुपात सजावट करण्यात आली होती.