World cup 2023 : वासिम अक्रमने काढली पाकीस्तानी संघाची इज्जत, म्हणाला त्यांनी इंग्लंडला ड्रेसिंग रूममध्ये कोंडून घ्यावं, कारण..

World cup 2023 : सध्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सुरू आहे. यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यामुळे संघावर टीका होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी खेळाडूच संघावर टीका करत आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीतून जवळपास बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला शेवटचा साखळी सामना इंग्लंडसोबत खेळायचा आहे. मात्र तो जिंकला तरी पाकिस्तान उपांत्य फेरीत जाईल की नाही याची शक्यता कमीच आहे.

या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघासाठी असे समीकरण तयार झाले आहे, त्यामुळे त्याला उपांत्य फेरी गाठणे अशक्य आहे. असे असताना संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रमने बाबर सेनेची खिल्ली उडवत आपला राग काढला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

याबाबत वसीम अक्रम एका टीव्ही शोमध्ये म्हणाला, पाकिस्तान क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करावी आणि नंतर इंग्लंडला त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये बंद करून ठेवावे आणि त्यांना मैदानावर येऊ देऊ नये. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याचा हा एकमेव मार्ग आहे. असे म्हणत त्याने टीका केली आहे.

दरम्यान, सलग चार सामन्यांत पाकिस्तानला सतत पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे संघावर टीका केली जात आहे. पाकिस्तानने आपले शेवटचे दोन सामने जिंकून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या असल्या तरी, न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या विजयाने पाकिस्तानची निराशा झाली आहे.

यामुळे त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना किमान २८० धावांनी विजय मिळवावा लागेल.

तसेच लक्ष्याचा पाठलाग केल्यास ५ षटकांत सामना संपवावा लागेल. अशा स्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे अशक्य झाले आहे. यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तान नेमकी कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.