Weather Forecast: येत्या ४८ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात काल रात्री पाऊस देखील झाला आहे.
यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार, आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस (Rain Alert) पडू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.
तसेच काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे. केरळ, तामिळनाडूचा काही भाग आणि कर्नाटक किनारी भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहे.
याचा परिणाम तापमानात वाढ झाली असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे दुसरीकडे उत्तर भारतात पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार आहे, असेही सांगितले जात आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. तर काही जिल्ह्यात दाट धुक्याचा प्रभाव जाणवत आहे. यामुळे हवामानात अनेक बदल दिसून येत आहेत. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी बाप्पयुक्त वारे वाहत आहे.
यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असंही हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे फळबागा असलेले शेतकरी चिंतेत आहेत.