बॉयफ्रेण्डला भेटायला गेली अन् घडलं भयंकर, जंगलातील ‘त्या’ तरुणीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले…

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

आता गडचिरोली शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर पोर्ला ते वडधा मार्गावरील जंगलात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या युवतीच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही युवती चंद्रपूर येथील रहिवासी असून वैरागड येथील तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्या युवकाला पोलिसांनी अटक केली. पोलीस याबाबत माहिती घेत आहेत.

याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. २२ डिसेंबर रोजी पोर्ला जंगलात १९ वर्षीय अनोळखी युवतीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.

यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तिच्या डोक्यातून रक्तस्राव झालेला होता, चेहऱ्यावर व्रण होते. तसेच मृत युवतीची ओळख पटवून तिच्या खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान गडचिरोली पोलिस दलासमोर होते. आता याबाबत माहिती समजली आहे.

पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक तसेच फिंगर प्रिंट विभागातील अधिकाऱ्यांनाही घटनास्थळावर पाचारण करण्यात आले.

गडचिरोली शहरातील एका गोपनीय बातमीदाराने चंद्रपूर येथून एक १९ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुलीच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन मृतदेहाचे फोटो दाखवले असता मृत मुलगी त्यांचीच असल्याची खात्री नातेवाईकांनी दिली.

दरम्यान, या युवतीचे वैरागड येथील निखिल मोहुले याच्याशी प्रेमसंबंध होते. तिला भेटण्याकरीता निखिल मूल येथे गेला होता. त्यानंतर पथकाने वैरागड येथून निखिल याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने या खुनाची कबुली दिली.