आजोबांच्या हातून पाण्यात पडलेलं ‘ते’ बाळ सापडलं? फोटोमागचं सत्य जाणून बसेल धक्का

यंदाच्या पावसाळ्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांचा जीवही जात आहे. त्यामध्ये काही लोक पावसाच्या पाण्यात वाहूनही जात आहे. अशात कल्याणमधून धक्कादायक घटना समोर आली होती.

पावसामुळे लोकल थांबली होती म्हणून ट्रॅकवरुन पायी जाणाऱ्या आजोबांकडून एक लहान बाळ पाण्यात पडलं होतं. त्याचा तपास सुरु असून लहान मुलीचे नाव रिषिका रुमाले असे होते. ते फक्त सहा महिन्यांचे होते.

सध्या त्या बाळाचा तपास सुरु आहे. रात्र झाल्यामुळे तपास थांबवण्यात आला होता. पण त्यानंतर तो तपास सुरु केला आहे. अशात काल एक फोटो व्हायरल झाला होता. बाळ सापडले असे सांगत तो फोटो व्हायरल करण्यात आला होता.

अनेकांनी बाळ सापडल्यामुळे आनंद व्यक्त केला होता. पण तो फोटो त्या बाळाचा नसल्याचे समोर आले आहे. त्या लहान मुलीचा शोध अजूनही सुरुच आहे. सध्या बाळाला शोधण्यासाठी बचावपथक शर्तीचे प्रयत्न करत आहे. पण तो नाला वाहता असल्यामुळे त्यांना त्या बाळाला शोधणं कठीण होत आहे.

दरम्यान, रिषिकाची आई योगिता रुमाले हिचे सासर हैद्राबादला आहे. पण प्रसुतीसाठी ती भिवंडीत आपल्या आईवडिलांकडे आली होती. सहा महिन्यांपासून रिषिका आणि तिची आई इथेच राहत होते. बुधवारी योगिता आपल्या वडिलांना तपासणीसाठी सोबत घेऊन गेली होती. त्यावेळी पाणी साचल्यामुळे लोकल थांबवण्यात आली होती.

खुप वेळ लोकल थांबल्यामुळे प्रवासी पायी चालत निघाले होते. त्यावेळी योगिताही आपल्या वडिलांसोबत पायी चालत निघाली. चालताना बाळ तिच्या वडिलांकडे होते. अशात ते पाइपवरुन चालत असताना त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते बाळ थेट नाल्यात पडले. पण वाहते पाणी असल्यामुळे ते वाहून गेले. त्यानंतर तातडीने त्या मुलीच्या शोध कार्याला सुरुवात झाली. पण अजूनही ते बाळ मिळालेले नाही.