पोर्शे अपघाताच्या १ दिवस आधी काय घडलं? मुलाचा ‘तो’ व्हिडीओ समोर, आता आरोपीला कोणीही वाचवू शकणार नाही…

आठवड्यापूर्वी पुण्याच्या झालेल्या पोर्शे अपघातात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यावेळी कार अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचा आरोप आहे. याबाबत तपास सुरू आहे. याबाबत राजकीय वातावरण तापलं आहे. त्याने अपघाताआधी मद्यपान केल्याचा आरोप झाला.

अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. त्यात आरोपी मद्यपान करताना दिसला. आता या प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलगा कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. हे फुटेज अपघाताच्या एक दिवस आधीचे आहे.

या व्हिडीओमध्ये मुलगा पोर्शे कारच्या ड्रायव्हर साईडमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्यामुळे अपघाताच्या आदल्या दिवशी आरोपी तरुण कार चालवत होता हे सिद्ध होतं. यामुळे त्याला गाडी चालवायला येते हे देखील सिद्ध झाले आहे. अपघातावेळी अल्पवयीन मुलगा कार चालवत नव्हता, चालक कार चालवत होता, असे त्याच्या वकिलाने म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर नवे सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे आहे. दरम्यान, कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभाला आरोपी त्याच्या मित्रासह गेला होता. दोघेही पोर्शे कारनंच कॉलेजला गेले होते. यामुळे हा एक महत्वाचा पुरावा मानला जात आहे.

या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी आरोपी मुलगा कार चालवत नव्हता, असे अनेकांनी त्याला वाचवण्यासाठी सांगितलं. आरोपीच्या शेजारी बसलेल्या चालकाने अपघाताचा आळ स्वत:वर घ्यावा यासाठी बराच दबाव टाकण्यात आला, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली आहे.

दरम्यान, या अपघात प्रकरणी आता पुण्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर हे आक्रमक झाले असून याबाबत सविस्तर तपास होण्यासाठी आंदोलन करत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.