काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वायनाड मतदार संघातून यावेळी काँग्रेसकडून प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेले शपथ पत्र आणि त्यामध्ये दिलेले संपत्तीचे आकडे पाहून याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामुळे आत्तापासूनच प्रियांका गांधी या विरोधकांच्या रडारवर आलेल्या आहेत. प्रियंका गांधी वाड्रा यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये त्यांची जंगम मालमत्ता चार कोटी चोवीस लाख रुपयांची असून त्यांच्याकडे रोख 52 हजार रुपये आहेत. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच म्युच्युअल फंडामध्ये दोन कोटी 24 लाख रुपये असून, बँकेमध्ये तीन लाख साठ हजार रुपये आहेत. पीपीएफ खात्यामध्ये 17 लाख 38 हजार रुपये, तर सोन्याचे एक कोटी 15 लाख रुपयांचे दागिने आहेत. यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.
तसेच त्यांच्याकडे लागवडीखालची जमीन 2 कोटी 10 लाख रुपयांची तर शिमलामध्ये पाच कोटी 63 लाख 99 हजार रुपयांचे घर अशी बारा कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी जाहीर केली. प्रियंका या वाइनड मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रियांका गांधी वाड्रा यांनी दिलेल्या या शपथपत्रावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रियंका गांधी यांची डोळे दीपवणारी संपत्ती असून, ती लग्नात आहेर म्हणून आईने दिले असावी, अशी टीका केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने वायनाड पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले होते. वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या कालच केरळमध्ये दाखल झाल्या होत्या.