सामन्यानंतर विजयोत्सव साजरा करताना क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका, मैदानावरच मृत्यू, घटनेने उडाली खळबळ…

क्रिकेट विश्वात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकचा माजी क्रिकेटर के. होयसला याचा वयाच्या ३४ व्या वर्षी हार्ट अटॅकने मृत्यू झाला. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. बंगळुरूमध्ये आरएसआय क्रिकेट ग्राऊंडवर साऊथ झोन स्पर्धा सुरू होती.

यावेळी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या टीम एकमेकांविरुद्ध खेळत होत्या. यावेळी अतीतटीच्या सामन्यात कर्नाटक संघाचा विजय झाला. विजयोत्सव साजरा करताना के. होयसलाच्या छातीत दुखू लागले. यामुळे मोठी पळापळ झाली. तो शुद्ध हरपून तो मैदानात पडला.

नंतर इतर सहकाऱ्यांनी त्याला रुग्णवाहिकेतून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यामुळे सगळेच हादरले. यावर अनेकांनी दुःख व्यक्त केले. के. होयसला हा मधल्या फळीचा फलंदाज आणि एक उत्तम गोलंदाज देखील होता.

त्याने अंडर २५ मध्ये कर्नाटक संघाचे नेतृत्व केले होते. यासह तो कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये देखील सहभागी होता. डॉक्टर म्हणाले, जेव्हा खेळाडूला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यावेळीच त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे उपस्थित सर्वांना एकच धक्का बसला.

पोस्टमार्टम रिपोर्टमधून सर्वकाही समोर येईल. डॉक्टरने सांगितले की हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाले आहे. २२ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेची माहिती शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) रोजी बाहेर आली. होयसाला हे अष्टपैलू खेळाडू होते. मधल्या फळीत ते फलंदाज आणि गोलंदाजीही करत.

त्यांनी अंडर २५ श्रेणीमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच कर्नाटक प्रिमियर लीगमध्येही सहभाग घेतला होता. दरम्यान, अनेक खेळाडू हे खेळताना मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.