अनेकदा विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर काम करत असताना अनेक दुर्दैवी घटना घडत असतात. यामुळे अनेकांचे जीव यामध्ये जातात. आता विद्युत तारेवरील कावळा काढताना विजेचा जोराचा धक्का लागून एका वायरमनचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना पैठण तालुक्यातील लोहगाव येथे मंगळवारी सकाळी घडली. श्रीपाद राजाराम भोंडे असे यामध्ये मृत्यू झालेल्या वायरमचे नाव आहे. ते पाटेगाव, ता. पैठण) याठिकाणी कार्यरत होते. यामुळे याबाबत चौकशी सुरू आहे.
दरम्यान, लोहगाव येथे विद्युत तारेवर कावळा लटकला होता. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी हे वायरमन श्रीपाद भोंडे लोखंडी रॉडच्या साह्याने कावळा काढत होते. मात्र विद्युत पुरवठा सुरूच होता. यामुळे त्यांना शॉक बसला.
त्यांना विजेचा जोराचा धक्का बसल्याने त्यांना ग्रामस्थांनी बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र त्यांचे जागीच निधन झाले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांना तपासून मृत घोषित केले. यामुळे मोठी खळबळ उडाली. यामुळे निष्काळजीपणामुळे की अजून कशामुळे ही घटना घडली याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरासे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे, ढाकेफळ विभागाचे तावरे यांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. यावेळी मोठी गर्दी झाली होती.