ज्या बाबाच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरीत 116 जणांचे जीव गेले, तो बाबा आहे कोण? भयंकर माहिती आली समोर…

कालच उत्तर प्रदेशच्या हाथरस याठिकाणी एक भयंकर दुर्घटना घडली. यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे भोले बाबा यांच्या प्रवचन कार्यक्रमात चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली आहे. यामध्ये अनेकांचे जीव गेले.

भोले बाबांच्या सत्संगाच्या या भव्य कार्यकमात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेने अनेक भक्तांचे बळी घेतले आहेत. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये ज्यांचे जीव गेले त्यांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. यामध्ये सरकारने मदत जाहीर केली आहे.

आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. भोलेबाबाचे याआधी अनेकदा विविध वादांमध्ये नाव समोर आल आहे. बाबा १७ वर्ष पोलीस खात्यातील नोकरीत होते. नंतर त्यांनी व्हीआरएस घेवून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर ते अनेक ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करू लागले.

कोरोना काळात त्यांना ५० अनुयायी जमवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ५० हजारांहून जास्त लोकं जमल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भोलेबाबाचं मूळ नाव सूरज पाल आहे. अनेकदा ते वादात देखील अडकल्याची माहिती समोर आली आहे.

भोले बाबांनी कासगंज जिल्ह्यातील पटियाला येथील एका छोट्या घरातून सत्संगची सुरुवात केली होती. आता या भोले बाबांचा प्रभाव हा पश्चिम युपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशपर्यंत आहे. भोले बाबा कधी एकेकाळी पोलीस खात्यात नोकरी करायचे. आता ते स्वत:ला परात्माचा चौकीदार असल्याचे सांगतात.

याबाबत त्यांच्या असंख्य भक्तांचे म्हणणं आहे की, भोले बाबा हे देवाचे अवतारच आहेत. पण हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत निष्पापांच्या मृत्यूला हाच बाबा जबाबदार असल्याची चर्चा होत आहे.