मृत्यूनंतर नितीन देसाईंचं 250 कोटींचं कर्ज कोण फेडणार? वाचा काय आहे बँकेचा नियम..

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे बुधवारी पहाटे निधन झाले आहे. २५० कोटींच्या कर्जामुळे ते तणावात होते. तसेच ती रक्कम फेडणे अशक्य झाल्यामुळे त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाचा पोलिसांचा अंदाज आहे.

नितीन देसाई यांनी २०१६ मध्ये एका कंपनीकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०२३ मध्ये ते कर्ज वाढून २५० कोटी रुपयांचे झाले. त्यामुळे ते खुप तणावात होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पण आता त्यांच्या नंतर हे २५० कोटींच्या कर्जाचं नक्की काय होणार असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.

नितीन देसाई यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कंपनीला ते कर्ज कोण देणार अशी चर्चा सगळीकडे होत आहे. पण यासाठी वेगवेगळे नियम असतात. कर्जदाराचा मृत्यू झाला तर होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन यांची सगळ्यांची रिकव्हरी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.

होम लोन असेल तर घराचे कागदपत्र तारण म्हणून ठेवले जातात. त्यावेळी एक सहकर्जदार म्हणून एका व्यक्तीचे नाव द्यावे लागते. जर कर्जदाराचा मृत्यू झाला. तर सहकर्जदार ते कर्ज भरतो किंवा मग त्या व्यक्तीची मुलं किंवा नातेवाईकांना हे कर्ज फेडावे लागते. जर ते सक्षम असतील तर त्यांना ती जबाबदारी दिली जाते.

तसेच बँक कर्ज फेडण्यासाठी काही पर्याय सुद्धा देतात. बँक किंवा फायनान्स कंपन्या वारसदारांना मालमत्ता विकून कर्ज फेडण्याचा पर्याय देतात. जर त्यांनी नकार दिला तर बँक त्याचा लिलाव करते. त्यातून कर्ज वसूल केले जाते.

तसेच कर्ज देताना बँकेकडून व्यक्तीचा विमा काढला जातो. जर व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्या विम्यातून बँक पैसे वसूल करते. पण पर्सनल लोन सुरक्षित लोनच्या यादीमध्ये बसत नाही. कारण कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक दुसऱ्या व्यक्तीकडून पैशांची वसुली करु शकत नाही. वारसदारांकडूनही बँकेला पैसे मागता येत नाही.

अशात कार लोन मात्र होम लोनसारखं सुरक्षित असतं. कर्ज घेऊन कार खरेदी केली. त्यानंतर जर लोन पुर्ण न भरता कर्जदाराचा मृत्यू झाला. तर कंपनीकडून कुटुंबियांना कर्ज फेडण्यास सांगितले जाते. पण त्यांनी नकार दिला तर कार जप्त केली जाते.