मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून वास आल्याने ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली. त्यांच्या पार्थिवाला मुलगा गश्मीरने अग्नी दिला. या घटनेनंतर गश्मीरवर अनेकांनी टीका केली.
इतके दिवस होऊनही आता प्रेक्षकांनी गश्मीरवर टीकेची झोड उठवली आहे. गश्मीरने वडील रविंद्र महाजनी यांच्याकडे लक्ष दिले नाही, त्यांची काळजी घेतली नाही, असे म्हणत अनेकजण त्याच्यावर टीका करत आहेत. वडिलांचे अशा पद्धतीने निधन होणं आणि गश्मीरचे त्या ठिकाणी नसणे याबद्दल त्याला दोष देण्यात आला.
यावर गश्मीरने लगेच काही प्रतिक्रिया देणे टाळले होते. याबाबत आता तो प्रतिक्रिया देत आहे. नुकतेच गश्मीरने इन्स्टाग्रामवर #askme सेशन घेतले. गश्मीरला त्याच्या अनेक चाहत्यांनी विविध प्रश्न विचारले. गश्मीरला त्याच्या आगामी प्रोजेक्टसह अनेक विषयांवर प्रश्न विचारण्यात आले.
रविंद्र महाजनी यांच्याबाबतही त्याला प्रश्न विचारण्यात आला. ‘वडील वारले की केस कापतात यावर काय बोलाल. मला तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकायला आवडेल’ असा प्रश्न गश्मीला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं गश्मीरने उत्तर दिले आहे.
तो म्हणाला, मी जे कार्य करतो त्यावर माझ्या कुटुंबाचे अर्थांजन होते. टक्कल केले असते तर हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का? असा असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
दरम्यान, त्यांचे वडील वीस वर्षांपासून वेगळे राहत होते. मी माझ्या वडिलांना एका छोट्या घरात सोडले आणि मी लक्झरी आयुष्य जगत आहे, असे अनेकांना वाटत होते पण तसे काही नव्हते. त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. असेही त्याने आधीच सांगितले आहे.