---Advertisement---

मुलगा प्रसिद्ध अभिनेता तरी रवींद्र महाजनी एकटे का राहत होते? फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

---Advertisement---

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रवींद्र महाजन यांचा फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यांचा मुलगाही एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यामुळे ते फ्लॅटमध्ये एकटे का राहायचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका फ्लॅटमध्ये राहत होते.

रवींद्र महजान यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा मुंबईत राहतो. पोलिसांनीच गश्मीरला याबाबत सांगितले आहे. त्यानंतर तो तळेगाव दाभाडीला रवाना झाला आहे. शवविच्छेदनानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे.

मुलगा इकता मोठा स्टार असूनही ते एकटे का राहते होते? याचीच सध्या चर्चा होत आहे. ते तळेगाव दाभाडेला भाडेतत्वावर राहत होते. त्यांचा मृत्यू हा दोन दिवसांपूर्वी झाला आहे. त्यामुळे इतक्या दिवसांत त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांच्याशी संवाद का साधला नाही? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहे.

गश्मीर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तो रियालीटी शोमध्ये दिसून आला होता. तर आशितोष गोवारीकर यांच्या पानिपतमध्ये रवींद्र आणि गश्मीर हे दोघेही एकत्र दिसून आले होते.

रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला होता. पण त्यांचे बालपण हे मुंबईत गेले होते. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी नाटकामध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी झुंज, मुंबईचा फौजदार, देवता अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---