पांड्याच्या ‘या’ मुर्खपणाने कापले भारताचे नाक, दुबळ्या विंडीजसमोर लाजिरवाना पराभव; १५० धावांचे आव्हानही नाही पेलवले

वेस्ट इंडिज आणि भारत (WI vs IND) यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना त्रिनिदाद येथे खेळला गेला ज्यात टीम इंडियाचा 4 धावांनी दारूण पराभव झाला. यासह विंडीजने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने खराब फलंदाजी करत गोलंदाजांची मेहनत वाया घालवली.

पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार रोमन पॉवेलने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 गडी गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 20 षटकांत 9 विकेट गमावून 145 धावा केल्या.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात (WI vs IND) भारताकडून उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली, ज्यामुळे विंडीजचा संघ 149 धावांत गारद झाला. विंडीजसाठी निकोलस पूरन आणि कर्णधार रोमन पॉवेल यांनी तुफानी फलंदाजी केली.

पुरणने या सामन्यात 34 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. पॉवेलने 32 चेंडूंत 3 षटकार-3 चौकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय ब्रेंडन किंगने 28 धावांची मोठी खेळी केली तर बाकीचे फलंदाज 10 धावाही करू शकले नाहीत.

या सामन्यात (WI vs IND) भारताकडून अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहलने 2-2 तर हार्दिक-कुलदीपला 1-1 विकेट मिळाली.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात (WI vs IND), भारताने 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खराब सुरुवात केली. शुभमन गिल 3 आणि इशान किशन 6 धावा करून बाद झाले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डाव सांभाळला पण दोघांनीही झटपट विकेट गमावल्या.

सूर्याने 21 चेंडूंत 2 चौकार-1 षटकारांच्या मदतीने 21 धावा केल्या, तर टिळक वर्माने 22 चेंडूंत 3 षटकार-2 चौकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. यानंतर हार्दिक पंड्या 19 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

हार्दिक बाद झाल्यानंतर संपूर्ण संघ पत्त्याच्या घरासारखा कोसळला. या सामन्यात वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर आणि ओबेड मॅककॉयने 2-2 तर अकील होसेनने 1 बळी घेतला.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. पण पहिल्याच सामन्यात पांड्याने मोठ्या चुका केल्या. त्याला गोलंदाजांचा योग्य वापर करता आला नाही.

गोलंदाजीत युझवेंद्र चहल चांगल्या लयीत दिसला. पहिल्याच षटकात त्याने २ बळी घेतले. पण पांड्याने चहलची 4 षटकेही पूर्ण केली नाहीत. 1 षटक शिल्लक असतानाही त्याला गोलंदाजी करायला लावले नाही. पंड्याने चहलला ते एक षटक टाकण्यास परवानगी दिली असती तर वेस्ट इंडिजला १४९ धावांपर्यंत मजल मारणे कठीण झाले असते.