जिंकता जिंकता हरला भारत; पांड्याच्या ‘या’ मुर्खपणामुळे भारताचा सलग दुसरा लाजिरवाना पराभव

वेस्ट इंडिज आणि भारत (WI vs IND) यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना गयाना येथे खेळला गेला ज्यामध्ये टीम इंडियाला 2 गडी राखून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यासह विंडीजने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला 20 षटकांत 7 विकेट गमावून केवळ 152 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 18.5 षटकांत 8 गडी गमावून 155 धावा केल्या.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात (WI vs IND) युवा फलंदाज तिलक वर्माने भारताची लाज वाचवली. त्याने अर्धशतकी खेळी खेळली. वर्माने या सामन्यात 41 चेंडूंचा सामना केला आणि 1 षटकार-5 चौकारांच्या मदतीने 51 धावा करून बाद झाला. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 30 धावाही करता आल्या नाहीत.

भारताकडून इशान किशन 27, शुभमन गिल 7, सूर्यकुमार यादव 1 तर संजू सॅमसन 7 धावा करून बाद झाला. त्याचवेळी हार्दिक पंड्या 24 आणि अक्षर पटेल 14 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. मुंगी रवी बिश्नोई 8 आणि अर्शदीप 6 धावा करून नाबाद राहिले. या सामन्यात वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ आणि अकील हुसैन यांनी २-२ विकेट घेतल्या.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात (WI vs IND) विंडीजचा संघ फलंदाजीसाठी क्रीझवर आला तेव्हा या संघाची सुरुवातही खराब झाली. ब्रेंडन किंग 0 आणि मेयर्सने 15 धावा करून बाद झाले. दोघेही पॅव्हेलियनमध्ये गेल्यानंतर जॉन्सन चार्ल्सला केवळ 2 धावा करता आल्या. त्यानंतर निकोलस पूरनने आघाडी घेत अर्धशतक झळकावले. पुरणने 40 चेंडूत 4 षटकार-6 चौकारांच्या मदतीने 67 धावांची खेळी केली.

पूरन बाद झाल्यानंतर विंडीजचा संघ डळमळला पण खालच्या फळीत अल्झारी जोसेफ आणि अकील हुसेन यांनी मोठे फटके मारून संघाला विजय मिळवून दिला. अल्झारी १० धावांवर तर होसेन १६ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून हार्दिकने 3, चहलने 2 तर अर्शदीप-मुकेशने 1-1 विकेट घेतल्या.

टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या या दौऱ्यात खराब कॅप्टन्सी करताना दिसत आहे. पंड्या हा आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जातो. पण पहिल्या सामन्यातही त्याने खराब कॅप्टन्सी केली. त्यामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने डावखुरा गोलंदाज अक्षर पटेलला एकही षटक दिले नाही. डावखुरा फलंदाज निकोलस पूरनसाठी पटेल धोकादायक ठरू शकतो. पण पंड्याने त्याला एकही षटक दिले नाही.

पहिल्या सामन्यात एका षटकात 2 बळी आणि या सामन्यातही 2 बळी घेणार्‍या चहलने संपूर्ण 4 षटके टाकली नाहीत. त्याला फक्त 3 षटके देण्यात आली. हार्दिक पांड्याच्या या मूर्खपणामुळे भारताचा सामना गमवावा लागला.