उत्तर प्रदेश येथील दारानगर गावात एक महिला गेल्या काही दिवसांपासून स्वत:ला आयपीएस असल्याचा बनाव करत होती. या महिलेने पोलिसांचा गणवेश घातला होता, यामुळे अनेकांना ते खरे देखील वाटले. अनेकांनी त्यांचे स्वागतही केले.
यानंतर याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. ज्यामध्ये ते गावातील सून आयपीएस असल्याचे लिहिले होते. यावरून आलापूर पोलिसांनी महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला गेला. पोलिसांना गावातील रहिवासी नेमपाल यांची पत्नी काजल यादव यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती मिळाली होती.
काजल यादव यांनी उत्तर प्रदेश पोलिसांचा गणवेश घातला होता, त्या गणवेशावर IPS असे देखील लिहिले होते. यामुळे सगळ्यांनी तिचा सत्कार देखील केला. ती लोकांना फसवत असल्याचे दिसून आले. तसेच लोकसेवकांचा गणवेश घालून त्याचा गैरवापर करत आहे.
दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची तक्रार एसएसपी डॉ.ओपी सिंह यांच्याकडे करण्यात आली होती. यामुळे याबाबतचा तपास सुरू होता. सुरुवातीला हे फोटो काजलने जत्रेत काढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.
असे असताना मात्र समोर आलेल्या फोटोंमध्ये काजय यादवचे गावात स्वागत केले होते आणि वेगवेगळया लोकांसोबत घेतलेल्या सेल्फीचा समावेश आहे, असे सांगण्यात आले. यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक धनंजय सिंह म्हणाले की, व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसत असलेल्या गुन्ह्याच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अधिक तथ्य व आरोप आढळून आल्यास कलम वाढवून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.