ताश्कंदमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिफ्टमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महिला तीन दिवस मदतीसाठी तडफडत होती. पण कोणीही तिच्या मदतीला धावून न गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.
महिला तीन दिवस मदतीसाठी आरडाओरड करत होती. पण कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही. अखेर तीन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लिफ्ट अडकली होती. त्यामुळे महिला आतच अडकून पडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ओल्गा लियोन्टिवा असे त्या महिलेचे नाव होते. ती ३५ वर्षांची होती. तिला तीन मुलंही होती. ती डिलिव्हरी ड्रायव्हरचे काम करायची. गेल्या आठवड्यात ती एका सामनाच्या डिलिव्हरीसाठी गेली होती.
एका इमारतीमध्ये गेल्यानंतर ती थेट लिफ्टमध्ये गेली. पण लिफ्ट खराब होती, याबाबत तिला माहिती नव्हते. ओल्गा लिफ्टमध्ये गेल्यानंतर लिफ्ट थोडी वर गेल्यानंतर जाम झाली. त्यातच वीज पुरवठाही खंडीत झाला. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर लिफ्टचा दरवाजा लॉक झाला.
ओल्गा आतमध्येच अडकली होती. तीन दिवस ती मदतीसाठी आरडाओरड करत होती. पण कोणापर्यंतही तिचा आवाज जात नव्हता. त्यामुळे अखेर तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. तिकडे तिचे कुटुंब पण चिंतेत होते.
तीन दिवस झाले ओल्गा घरी न आल्यामुळे कुटुंबातील सदस्य पोलिसांकडे गेले होते. ओल्गा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना ती इमारत दिसली ज्यामध्ये ओल्गा डिलिव्हरीसाठी गेली होती. त्यामुळे तपासासाठी पोलिस त्या इमारतीमध्ये पोहचले.
पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर ओल्गा लिफ्टमध्ये गेल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी ती लिफ्ट उघडली आणि लिफ्टमधून तिला बाहेर काढले. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अलार्म वाजला नव्हता. त्यामुळे ती लिफ्टमध्येच अडकली. तिथे तिला श्वास घेण्यासही अडचण येत होती. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.