World Cup Final : फायनलमध्ये आधी बॅटिंग करावी की बॉलिंग? किती धावा विजय मिळवून देणार? पिच क्युरेटरने सांगितला यशाचा मंत्र…

World Cup Final : आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या क्रिकेटची फायनल होणार आहे. यामुळे जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. हा सामना जिंकत वर्ल्डकप कोणाचा होईल याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. गुजरातमध्ये हा सामना होणार आहे.

भारताने आतापर्यंत एकही सामना हरला नाही. यामुळे भारताचाच विजय होईल असा ठाम विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे. यासाठी अनेकांनी पूजा देखील सुरू केली आहे. आता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पिच क्युरेटरने महत्त्वाची माहिती दिली आहे.

अंतिम सामन्यात ३१५ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला जाऊ शकतो. अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांना मदत करते. पण आयसीसीची स्पर्धा असल्याने खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना सहाय्य करणारी असेल. यामुळे नेमकं कोणाला साथ मिळणार हे लवकरच समजेल.

यामध्ये पहिल्या डावात ३१५ किंवा त्याहून अधिक धावा केल्यास जिंकण्याची शक्यता अधिक असेल. कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करणं कठीण होईल, अशी माहिती समोर आली आहे. दोन्ही कर्णधारांनी खेळपट्टीची पाहणी केली आहे.

यावेळी खेळपट्टीबद्दल माझ्या मनात कोणतीही चिंता नाही. कारण दोन्ही संघांना त्याच खेळपट्टीवर खेळायचे आहे, असे कमिंग्स म्हणाला. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल.

तसेच याकाळात चेंडू स्विंग होईल. पण त्यानंतर खेळपट्टी गोलंदाजांना फारशी मदत मिळणार नाही. आम्ही सर्व प्रयत्न करू, आम्ही भारताला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न करू, असेही त्याने म्हटले आहे. आता काही तासातच याबाबत परिस्थिती समोर येईल.