World Cup Final : आजचा दिवस हा भारतीय क्रिकेटसाठी महत्वाचा दिवस आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये क्रिकेट वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. हा सामना जिंकत वर्ल्डकप कोणाचा होईल याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. गुजरातमध्ये हा सामना होणार आहे.
भारताने आतापर्यंत एकही सामना हरला नाही. यामुळे भारताचाच विजय होईल असा ठाम विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे. यासाठी अनेकांनी पूजा देखील सुरू केली आहे. असे असताना आता ‘अॅस्ट्रोटॉक’चे सीईओ पुनीत गुप्ता यांनी देखील एक मोठा दावा केला आहे.
ते म्हणाले की, जर भारताने वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली तर कंपनीकडून युजर्सना १०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुनीत गुप्ता म्हणाले की, यावेळी माझ्यासोबत आमचे युजर्स आहेत.
ते मला मित्रांसारखेच आहेत. त्यांच्यासोबत आनंद लुटण्याची माझी इच्छा आहे. यामुळे आज मी माझ्या फायनान्स टीमसोबत चर्चा केली आणि आपल्या युजर्सना १०० कोटी रुपयांचे वाटप करण्याची शपथ घेतली. यामुळे हा एक मोठा आकडा आहे.
भारत वर्ल्डकप जिंकला तर युजर्सच्या वॉलेटमध्ये पैशांचं वाटप केले जाणार आहे. यामुळे जर असे काही झाले तर अनेकांचा फायदा होणार आहे. यामुळे याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भारताने २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यावेळचा सामन्यातील थरारही त्यांनी सांगितला. सामन्याच्या पूर्वसंध्येला आम्ही नीट झोपूही शकलो नव्हतो. संपूर्ण रात्रभर आम्ही सामन्याच्या रणनितीवर चर्चा करत होतो, अशी आठवण देखील त्यांनी सांगितले आहे.